सोलापूर प्रतिनिधी
फादर्स डे निमित्त गुरुकुल कॉम्प्युटर्स,ड्रीम फौंडेशन व श्री स्वामी समर्थ कोचिंग क्लाससेस तर्फे विद्यार्थी व पालकांसाठी प्रेरणादायी व्याख्यानाचे रविवार दि 18 जून 2023 रोजी सायं 5 ते 8 यावेळेत गोविंदश्री मंगल कार्यालय डी मार्ट जवळ जुळे सोलापूर येथे आयोजित केले आहे असे संयोजक सचिन चौधरी यांनी सांगितले आहे.
या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ, अशोक नगरकर पुणे वरिष्ठ वैज्ञानिक यांचे विषय :आयुष्य घडतांना यावर कॅप्टन आशा शिंदे पुणे यांचे विषय:NDA/CDS व SSB अधिकारी तयारी यावर मार्गदर्शन प्रा,बालाजी जाधव,प्रेरक वक्ते,लेखक यांचे विषय:जिनियसचा शोधात यावर मार्गदर्शन व संगिता पाटील यांचे विषय:विविध स्पर्धा परीक्षा तयारी यावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन होणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे माजी आ, दिलीप माने यांच्या शुभहस्ते होणार असून प्रमुख अतिथी म्हणून महादेव कोगनूरे संस्थापक एम के फौंडेशन,मा,श्री राजेंद्र हजारे जनकल्याण मल्टिस्टेट, प्रकाश राठोड संस्थापक आई प्रतिष्ठान व शिवलिंग मेडेगार वृत्तपत्र विक्रेते संघटना आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
या कार्यक्रमाचे संयोजन अंबादास पांढरे मुख्याध्यापक स्वामी विवेकानंद प्रशाला, उज्वला साळुंखे मुख्याध्यापीका सुरवसे हायस्कूल आप्पासाहेब केदार व काशीनाथ भतगुणकी यांनी केले असून तर विद्यार्थी व पालकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन गुरुकुल कॉम्प्युटर्स चे सचिन चौधरी यांनी केले आहे.
या कार्यक्रमात इ 10 वी व 12 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याहोणार असून यासाठी नाव नोंदणीसाठी संपर्क मो 7219099955 व 8275728388 या नंबरवर संपर्क साधावा अशी माहिती काशिनाथ भतगुणकी यांनी दिली आहे.