भाळवणी प्रतिनिधी
शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज गादेगाव येथे आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
आरक्षणाचे जनक थोर समाज सुधारक शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने शिवरत्न पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले .यावेळी त्यांच्या कार्याचा विद्यार्थ्यांनी आढावा घेतला शाहू महाराजांच्या विषयी संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे यांनी आपले विचार मांडले. आरक्षणाचे जनक म्हणून ज्यांची ओळख असे शाहू महाराज यांनी सर्वसामान्य जनतेसाठी कशा पद्धतीने योगदान दिले याविषयी आढावा घेण्यात आला.
यावेळी सहशिक्षक राजेंद्र भोसले ,दीपक देशमुख ,सोमनाथ भोईटे ,नागेश कांबळे ,संतोष पवार, वर्षा मोरे, शीतल बागल ,शीतल मस्के, सारिका गायकवाड ,अजय मोरे, नियाज मुलाणी व विद्यार्थी उपस्थित होते