पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व प्रतिष्ठित राजकारणी अजितदादा पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. तसेच विमानात असलेल्या इतरही सहप्रवाशांनी आपला जीव गमावला,
या दु:खद घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून विविध राजकीय व सामाजिक नेतृत्वांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव, उपप्राचार्य डॉ. भगवान नाईकनवरे, राजेश कवडे, सुशील कुमार शिंदे, अधिष्ठाता डॉ. बाळासाहेब बळवंत, डॉ. समाधान माने, डॉ. अनिल चोपडे, आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. अमर कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत एक श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती.
या सभेत महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी एकत्र येऊन अजितदादा पवार यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

