भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथे छत्रपती शिवाजी महाराज पालखी सोहळ्याचे सरपंच राजकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजेंद्र सिंह नाईक निंबाळकर राजे नाईक निंबाळकर सहकार शिरोमणी ची संचालक सुनील पाटील, प्राचार्य एन एम गायकवाड,फजलुमिया इनामदार, आनंद देशपांडे, संदीप जाधव, रवींद्र शिंगटे आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
भाळवणी येथील सरलष्कर सिदोजी नाईक निंबाळकर यांच्या ऐतिहासिक वाड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीचे मोठ्या जल्लोष स्वागत करण्यात आले.
यावेळी पालखी सोहळ्याचे प्रमुख संदीप महेंद्र म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवनेरी रायगड येथून पायी पालखी सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे या सोहळ्याच्या उद्देश पालखी मार्गावरील शाळेतील विद्यार्थ्यांना शिवरायांचे विचार समजले पाहिजे. तसेच या पालखी सोहळ्याची वैशिष्ट्ये म्हणजे शस्त्र रिंगण सोहळा, अश्व रिंगण सोहळा, व्यायाम कसरत देशभक्तीपर गीते अभंग भजन कीर्तन प्रवचन याविषयीचे प्रबोधन करणे हा आहे.असे हि महिद्र म्हणाले.
यावेळी न्यू इंग्लिश स्कूल भाळवणी येथील विद्यार्थ्यांनी गोल रिंगण करून विविध व्यायाम कसरत अभंग प्रार्थना करून पालखी सोहळ्याचे स्वागत केले. यावेळी वारकरी ग्रामस्थ शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी गावात सांगली जिल्ह्यातील बतीस शिराळा येथील गोरक्षनाथ महाराज यांच्या पालखीचा विसावा मंदिरात होता. दादा महाराज सातारकर यांनी पालखी सोहळ्याचे विसावा भाळवणी येथे होता. अनेक लहान मोठ्या दिंड्या भाळवणी येथून पंढरपूरकडच्या दिशेने ज्ञानबा तुकाराम गजरात प्रस्थान करीत होता