पंढरपूर प्रतिनिधी
भारतातील पहिला अभिनव कालवा जोड प्रकल्प मौजे उत्रोली, तालुका भोर येथे साकारला जात आहे. निरादेवघर कालवा व धोम बलकवडी कालवा मधील अंतर साडे तीन किलोमीटवर एकमेकाशी जोडला जात आहे .या मध्ये नीरा देवघर कालवा कि.मी. २२ येथून ०.९३ टीएमसी पाणी उचलून धोम बलकवडी कालव्या मध्ये टाकण्यात येणार आहे.अशी माहिती खा. रणजीतसिंह निंबालकर यांनी सांगितली आहे.
सध्या धोम बलकवडी कालव्यातून फक्त १ पाणी आवर्तन फेब्रुवारी - मार्च दरम्यान(पावसाळा सोडून) सोडण्यात येते. त्या मुळे शेतकऱ्यांना खूप अडचणी येतात.
या कामाच्या निविदाचे प्रकाशन महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून करणेत आले आहे. या कामाच्या पूर्णत्वा नंतर धोम बलकवडी कालवा चारमाही चा आठमाही होणार आहे, ज्याचा जास्तीत जास्त फायदा #फलटण तालुक्यास होणार आहे. या मुळे खऱ्या अर्थाने नियमित आवर्तनं मिळून शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे.