माळशिरस प्रतिनिधी
महाआरोग्य शिबिर वंदनी बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्यावतीने संत बाळूमामा पालखी सोहळा दरम्यान पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना मोफत वैद्यकीय तपासणी करून मोफत औषधे वाटप करण्यात आले आहे.
त्यावेळेस फोंडशिरस आरोग्य वैद्यकीय अधीक्षक डॉ रामचंद्र मोहिते त्यांचे सहकारी आरोग्य सहायिका चव्हाण व्ही पी कुरळे सौ कुरळे मॅडम भुमरे सर श्री जाधव सर श्री बंडगर सर व त्यांचे सहकारी यांनी शिबिरामध्ये वारकऱ्यांना फोंडशिरस ग्रामस्थांना मोफत तपासणी करून मोफत औषधे वाटण्यात मोलाचे कार्य केले.
त्यामध्ये विशेष करून फोन फोंडशिरस प्राथमिक आरोग्याचे मुख्य अध्यक्ष डॉक्टर श्रीरामचंद्र मोहिते सरांनी विशेष करून या आरोग्य शिबिरासाठी खूप खूप मोलाचे सहकार्य केले.
शिबिराचे आयोजक वंदनी बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे जिल्हा उप समन्वयक सतीश महादेव गावडे बारामती लिमटेक व मोरगाव गावचे सुपुत्र बारामती तालुका शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे तालुका समन्वयक मंगेश खताळ व बारामतीतील शिवसेना वैद्यकीय टीमने केले होते.