अभिषेक काळे, निखिल भालेराव, नागनाथ नागेशी,मेघांबरी हुल्लेनवरु यांच्या स्वरांनी सोलापूरकर रसिक भक्तिरसात तल्लीन
सोलापूर प्रतिनिधी
स्पाईस एन्ड आईस सोलापूर आयोजित प्रतिवर्षाप्रमाणे आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित अभंगवाणीला सोलापूर रसिकांचा पहाटे पहाटे हाऊसफुल्ल उदंड प्रतिसाद मिळाला,
सुरुवातीला गायक अभिषेक काळे, निखिल भालेराव, नागनाथ नागेशी, मेघांबरी हुल्लेनवरु, अपर्णाताई सहस्त्रबुद्धे,अनिष सहस्त्रबुद्धे,मनाली सहस्त्रबुद्धे,नागेश सहस्त्रबुद्धे ज्ञानेश्वर दुधाणे,गुणेश दाते, सचिन वाघमारे, अविनाश इनामदार यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली
सुरुवातीला सुर निरागस हो गणेश वंदनेने भक्तिरसाला सुरुवात झाली,त्यानंतर अनेक संतांच्या रचना त्यामध्ये देवाचिये द्वारी उभा क्षण,विश्वाचे आर्त ज्ञानियांचा राजा, अकार उकार मकार,येई ओ विठ्ठले,मोगरा फुलला,जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, मध्यंतरात चिमूकल्या आरोहीने तुज मागतो मी आता आणि देह शुध्द करुनी भजनी अभंग गाऊन रसिकांच्या मनाचा ठाव घेतला,माझे माहेर पंढरी अवघे गर्जे पंढरपूर आदी अभंग गाऊन सोलापूर रसिकांना मंत्रमुग्ध केले,आणि तितकेच सुंदर निवेदन आयोजिका अपर्णाताई सहस्त्रबुद्धे यांनी अभ्यासपूर्ण करत कार्यक्रमाची आगळीवेगळी उंची गाठली.
त्यांना तबला गुणेश दाते, पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे,बासरी सचिन वाघमारे,सिंथेसाईजर अविनाश इनामदार हार्मोनियम नागनाथ नागेशी यांनी केली,तसेच रसिकांनी ही अभंगवाणीला हाऊसफुल्ल गर्दीने प्रतिसाद दिला, याचवेळी सोलापूर जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रात आपली पताका पूर्ण जगभर गाजविणारे बालाजी सरोवराचे सर्वेसर्वा श्रीराम रेड्डी,यांचा सोलापूर ब्रॅण्ड अम्बेसिटर म्हणून आईस एन्ड स्पाईस सोलापूर यांच्या वतीने गौरविण्यात आले,यावेळी सोलापूर करांच गेली ४०वर्षाच प्रेम कधी विसरू शकत नाही सांगून यशाच गमक आणि भविष्यकाळातील नवीन उद्योग योजनांची माहिती दिली, यावेळी सतीश मालू, खुशाल भाई देढीया, प्रमोद साठे, नागेश सहस्त्रबुद्धे आदी उपस्थित होते,यावेळी ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमाला सहकार्य केले.
त्यांचे शब्द सुमनांनी स्वागत करुन आईस एन्ड स्पाईस सोलापूर ही सोलापूर बरोबर पुण्यात ही शाखा काढत असून पुढील काळात अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये शाखा निघतील असे सांगितले, कार्यक्रम अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने यशस्वी करण्यासाठी स्पाईस एन्ड आईस सोलापूर चे सर्व कार्यकर्त्यांनी अधिक परिश्रम घेतले, पहाटे ६:००वा हुतात्मा स्मृती मंदिर हाऊसफुल्ल भरले होते हे विशेष.