मोहोळ प्रतिनिधी
नशा मुक्त भारत पंधरवाडा अभियान अंतर्गत नशा मुक्तीचा संदेश पत्रिका द्वारे जिल्हा ब्रँड अँबेसिडर राजन घाडगे विविध ठिकाणी जाऊन देत आहेत.
सोलापूर जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर, महाराष्ट्र राज्य समन्वयिका अनुष्का गुप्ता जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविले जात आहे. नशा खोरी माणसाची कमजोरी, मद्य पान एक मनोविकार, शपथ घ्या मद्य कधीच नाही पिणार, कशापाई दारू पिता आपल्या घराला उध्वस्त करता, नको कण तंबाखूचा एक क्षण जीवनाचा, मद्य प्राशन करुन वहाने चालवू नका, नशा मुक्त भारत अभियान... असे घोषवाक्य असणाऱ्या पत्रिकातून जनजागृती करीत आहेत. नशा मुक्ति पर सामाजिक संदेश देत युवकांमध्ये, नागरिकांमध्ये जनजागृती करीत आहेत.
१२ जून ते 26 जून या कालावधीत अमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी नशा मुक्त भारत पंधरवडा राबविला जात आहे यामध्ये विविध उपक्रमाबरोबर प्रत्यक्ष भेटी घेत नागरिकांमध्ये सामाजिक दायित्व म्हणून व्यसनापासून अलिप्त राहण्याचा संदेश देत नागरिकांमध्ये जनजागृती करीत आहे.