पंढरपूर प्रतीनीधी
कर्नाटक राज्यातील विजापूर येथील बी .एल.डी .कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष तसेच बबलेश्वर विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आ.एम .बी पाटील यांची कर्नाटक राज्याच्या गृहमंत्रीपदी निवड झालेबद्दल त्यांचे विजापूर येथील निवासस्थानी जाऊन सत्कार करण्यात आला.
हा सन्मान करताना विजापूर विधान परिषद मतदार संघाचे आमदार .एस .बी पाटील साहेब , सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी जाधव ,शिवाजी शिक्षण शास्त्र महाविद्यालय बार्शीचे प्राचार्य .डॉ .श्री. सुग्रीव गोरे सर, प्रगतशील बागायतदार बलभीम जाधव ,सेवानिवृत्त पी .एस .आय .राजाराम जाधव यांच्या हस्ते विठ्ठलाची मूर्ती भेट देऊन स्वागत पर सत्कार करण्यात आला. विजापूर येथील पाटील घराण्यातील नामदार श्री. एम. बी पाटील हे मंत्रीआहेत तसेच आमदार एस. बी .पाटील हे दोघे सख्खे बंधू आहेत विजापूर येथील आ.पाटील राजघराण्याशी पत्रकार तानाजी जाधव यांचे गेले दोन वर्षापासून ऋणानुबंध आहेत .