मोहोळ प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोहोळ शहरातील गणपती मंदिर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते शालोपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी मोहोळ तालुका अध्यक्ष कैलास खडके, संजय पडळकर, तेजस आतकरे, महादेव मांढरे, महेश चव्हाण, आकाश गायकवाड, शाहू राजे देशमुख, इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन मोहळ शहराध्यक्ष शाहूराजे देशमुख यांनी केले आहे.

