अकलूज प्रतिनिधी
मोदी @9 अभियाना अंतर्गत घेण्यात येणाऱ्या घरोघरी संपर्क आभियानाची बैठक विधान परिषदेचे विद्यमान आमदार रणजितसिंह (दादासाहेब) मोहिते-पाटील व भाजप जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील(भैय्यासाहेब) मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शना खाली संपन्न झाली.
सदर बैठकीस पंचायत समिती उपसभापती प्रतापराव पाटील, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मुख्तार भाई कोरबु ,भाजप तालुका सरचिटणीस व घरो घरी जनसंपर्क अभियान प्रमुख सुरज मस्के, तालुका सरचिटणीस संदिप घाडगे पाटील, अभियान तालुका सहप्रमुख स्वप्नील शहाणे, अमित पुंज, रोहन पवार व सर्व शक्तीकेंद्र प्रमुख उपस्थितीत होते.
सदर कार्यक्रमामध्ये घरोघरी जनसंपर्क अभियानाचे पञक सर्व शक्तीकेंद्राना आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.