पंढरपूर प्रतिनिधी
आषाढी यात्रा हा पंढरपूरचा मोठा सोहळा असतो. आषाढी यात्रेनिमित्त भाविकांची वाढती संख्या, पावसाची अनिश्चितता लक्षात घेऊन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने दर्शन रांगेत पत्रा शेडची संख्या वाढवावी तसेच 24 तास पिण्यासाठी आर ओ चे थंड पाणी उपलब्ध करुन द्यावे, शिवाय दोन वेळ चहा, नाश्ता व खिचडी व जेवणाची ही सोय करावी.
तसेच दर्शन रांगेत स्वच्छता राहील, भाविकांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात यावी, दर्शन रांगेत जावो जागो जागी मुताऱ्या व हंगामी शौचालये उभारली जावेत. राज्यभरातील वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, त्याशिवाय प्रथम उपचार सुविधा व रुग्णवाहिका याचीही तातडीची सेवा म्हणून सोय असावी.
तसेच चंद्रभागा पात्रा मध्ये भाविकांना कपडे बदलण्यासाठी चेंजिंग रुम ची व्यवस्था करण्यात यावी, तसेच चंद्रभागेचे पात्र स्वच्छ राहील याची काळजी घेण्यात यावी.
अशा मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी पंढरपूर,व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर यांना सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी ग्राहक संरक्षण सेलच्या वतीने जिल्हाध्यक्ष श्री संग्राम सुभाष जाधव यांनी दिले आहे.
आषाढी यात्रा कालावधीत राज्यभरातून आलेल्या वारकऱ्यांची गैरसोय झाल्यास महाराष्ट्र राज्य काॅग्रेस कमिटी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्र राज्य काॅग्रेस कमिटी ग्राहक संरक्षण सेल प्रदेशाध्यक्ष नितीन भाऊराव पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते-पाटील,आ.प्रणितीताई शिंदे यांचे नेतृत्वाखाली सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी ग्राहक संरक्षण सेलच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशाराही संग्राम सुभाष जाधव यांनी उपविभागीय अधिकारी पंढरपूर, व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला दिला आहे.
यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी ग्राहक संरक्षण सेल पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.