पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियाना अंतर्गत (राज्य स्तर) योजने अंतर्गत पंढरपूर नगरपरिषदकडून 157 कोटींच्या रस्त्याच्या कामांचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य शासनाकडे दाखल केला आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लेखीपत्रकाद्वारे सदर प्रस्तावास लवकरात लवकर निधी मंजूर करावा अशी मागणी मा.आ.प्रशांत परिचारक केली.
तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे वर्षाकाठी एक कोटी भाविक तर दैनंदिन पन्नास हजारहून अधिक भाविक श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी हजेरी लावतात. तसेच शहराच्या सर्व भागात मठ, लॉज व हॉटेल यांची संख्या देखील वाढली असल्याने भाविकांची वर्दळ असते.
मात्र पंढरपूर शहरातील प्रमुख रस्त्यांची कामे पुर्णपणे रखडलेली असल्याने नागरिकांची व भाविकांची होणारी गैरसोय लक्षात घेवून पंढरपूर नगरपरिषदकडून विविध रस्त्यांच्या कामांचा प्रस्ताव बनवून महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानाअंतर्गत आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, वरळी, मुंबई यांच्याकडे दाखल केलेला आहे. मागील सरकारच्या काळात हा प्रस्ताव दाखल केला होता.
परंतु तो सरकारने रद्द केल्यामुळे पंढरपूर शहरातील व उपनगरातील विविध रस्त्याची कामे रखडलेली आहेत.