वाडी कूरोली प्रतिनिधी
वसंतराव काळे औदयोगिक प्रशिक्षण संस्था धोंडेवाडीचा (HSC) बारावीचा 100 % निकाल लागला आहे.
वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आयटीआय मध्ये दोन वर्षाचा कोर्स पूर्ण करून सोबतच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे मार्फत फेब्रुवारी मार्च 2023 मध्ये झालेल्या परीक्षेत वसंतराव काळे आयटीआय धोंडेवाडी मधील 38 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
या यशा बद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्याणरावजी काळे , सचिव बाळासाहेब काळे गुरुजी, आयटीआयचे प्राचार्य संतोष गुळवे सर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले . तसेच त्यांना भविष्यातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.