पंढरपूर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य संघाचे माजी अध्यक्ष राज्य संघाचे सल्लागार शिक्षकांचे प्रेरणास्थान बाळासाहेब काळे गुरुजी व जिल्हा सोसायटीचे माजी चेअरमन दादाराजे देशमुख व पंढरपूर तालुक्यातील प्रदीर्घ सेवा बजावून वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या सर्व शिक्षकांचा सन्मान सोहळा श्री विठ्ठल रुक्मिणी पॅलेस पंढरपूर येथे संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाप्रसंगी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे लोकप्रिय पाणीदार आमदार समाधान दादा अवताडे यांच्या शुभहस्ते व माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले की, काळे गुरुजी यांनी सारस्वत मंदिरामध्ये समर्पक आणि विद्यार्थी प्रिय सेवासाधनेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना सहकार आणि आकार देत असताना विद्या सेवेचे व्रत अविरतपणे पेरले आहे. ज्ञान पंढरीचा हा उपासक आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त जरी होत असला तरी शैक्षणिक क्षेत्रासाठी त्यांनी दिलेले योगदान कदापि विसरता येणार नाही. बाळासाहेब काळे गुरुजी व दादाराजे देशमुख व इतर सर्व सेवा शिक्षकांनी अनेक विद्यार्थी घडवले उच्चशिक्षित अधिकारी इंजिनिअर वकील डॉक्टर हे झाले आहेत.
तसेच पुढील आयुष्य आपले सुखी समाधानी व निरोग्य जावो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी चेअरमन श्री.कल्याणराव काळे, चेअरमन श्री. अभिजीत आबा पाटील, श्री.सुभाषराव माने,श्री. वसंतनाना देशमुख,श्री. नागेश फाटे,श्री. अंकुश काळे,श्री. गणेश पाटील,श्री. सुधीर आबा भोसले,श्री. उत्तमराव जमदाडे,श्री. शेखर कोरके,श्री. विजयसिंह दादा देशमुख,श्री. माधवराव पाटील, श्री. केशवराव जाधव, गटशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे,श्री. तुकाराम आबा कुरे संभाजी कोरे गुरुजी,श्री. मारुती शिरसागर गुरुजी,श्री. तानाजी शिंदे गुरुजी, मार्केट कमिटीचे सदस्य श्री.शिवदास ताड गुरुजी,श्री दादा मोरे मेंबर,श्री.आतीक मुलाणी, मान्यवर उपस्थित होते..