पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर येथील रेश्मा तांबोळी हिची नुकतीच सरकारी वकील पदी निवड झाली आहे. तिच्या या यशाबद्दल पंढरपूर येथे तिचा तांबोळी समाज व सर्व क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी रेश्मा तांबोळी यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की आजच्या काळात मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी घरातून, समाजातून प्रोत्साहन मिळाले पाहिजे तरच मुली आपल्या आयुष्यात यशस्वी होऊ शकतात. मुलींनीही आपल्या पालकांचा, समाजाचा विचार करून योग्य प्रकारे आपले ध्येय साध्य करावे. विवाहा नंतर देखील रेश्मा ने शिक्षण सुरच ठेवले त्यासाठी तिचे पती व घरातील सर्वांनी उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. हाआदर्श सर्वांनी घ्यावा यासाठी या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी नगरसेवक इब्राहिम बोहरी, बशीर तांबोळी, राजुभाई मुलाणी, पापामियां इनामदार, जब्बार देवळे, रज्जाक तांबोळी, इस्माईल बोहरी, फारुक बोहरी, मुन्ना शेख, समीर मोदी यांचे सह सर्व स्तरातील समाज बांधव उपस्थित होते. सर्वांनी तिचे अभिनंदन केले.