शास्त्रीय संगीताचे महोत्सव आयोजित करणे शिवधनुष्य:- पं.शौनक अभिषेकी
पंढरपूर प्रतिनिधी
तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणे व नादब्रह्म कला फाउंडेशन करकंब यांचे वतीने आयोजित पद्मश्री पं.जितेंद्र अभिषेकी दोन दिवशीय संगीत महोत्सवात त्यांचेच सुपूत्र व शिष्य पं.शौनक अभिषेकी यांच्या गायनाने आणि यशवंत वैष्णव यांचे दमदार तबला वादनाने पंढरपूरकर कलारसिक मंत्रमुग्ध झाले.
सुरुवातीला पं.शौनक अभिषेकी, भगवानराव मनमाडकर, अर्बन बँक उपाध्यक्षा माधूरीताई जोशी,सदस्य एस. पी. कुलकर्णी,उदय उत्पात, प्रसाद कुलकर्णी आयोजक ज्ञानेश्वर दुधाणे देवकी दुधाणे,यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने सुरुवात झाली.प्रास्ताविक ज्ञानेश्वर दुधाणे यांनी संगीत महोत्सव सुरू करण्यामागचा उद्देश सांगून संगीत प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सर्व कला रसिकांनी साथ देण्याचं आवाहन केले.आणि तदनंतर श्री भगवानराव मनमाडकर यांना नादब्रह्म कला फाउंडेशन करकंब यांचे वतीने संगीत सेवा सन्मान पुरस्कार पं.शौनक अभिषेकी यांच्या शुभहस्ते देऊन सन्मानित करण्यात आले त्यानंतर पं.शौनक अभिषेकी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की एखादा संगीत महोत्सव सुरू करण अतिशय सोपं आहे परंतु ते टिकवण हे एक शिवधनुष्य आहे.आणि ते टिकवण्यासाठी सर्व पंढरपूर कलारसिकांनी साथ द्यावी, भारतातील नामवंत ख्यातनाम कलाकार आणण्याची जबाबदारी माझी, अतिशय सुंदर वातावरणात या संगीत महोत्सवाच उद्घाटन झाल्याची घोषणा करत मनोगतात सांगितले त्यानंतर विश्वजित मेस्त्री गोवा यांच्या गायनाला सुरूवात झाली त्यांनी राग पूरीया कल्याण विलंबीत एकताल सादर केला त्यानंतर बंदिश सुरत पिया की नाट्यगीत आणि आम्हां न कळे ज्ञान अभंग सादर केला. त्यानंतर दुसऱ्या सत्रात पं.शौनक अभिषेकी यांच्या गायनाला सुरूवात झाली त्यांनी राग गोरख कल्याण तालात सादर करत पंढरपूर कला रसिकश्रोत्यांना मंत्रमुग्ध करत पं.जितेंद्र अभिषेकी यांची प्रसिध्द बंदिश गायली त्यानंतर लागी करजवा कट्यार, शब्दावाचून कळले सारे, नाही पुण्यांची मोजणी, आणि शेवटी भैरवीत पं.जितेंद्र अभिषेकी यांनी अजरामर केलेली सर्वात्मका सर्वेश्र्वरा,ठेवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर गाऊन गायनाची सांगता केली.त्यांना तितकीच अप्रतिम सुंदर साथसंगत तबला प्रणव गुरव हार्मोनियम माधव लिमये पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे टाळ शरद जाधव यांनी केली.
या कार्यक्रमाचे सुंदर निवेदन संकेत कुलकर्णी यांनी केले कलाकारांची ओळख राजेश खिस्ते यांनी केली.भारत गदगे सरांनी कलाकारांच अप्रतिम स्केच काढून भेट दिले, दुसऱ्या दिवसाची सुरुवातही अतिशय सुंदर होतं मान्यवरांच्या दीपप्रज्वलनाने सुरुवात करुन सत्यजीत बेडेकर यांचं अप्रतिम गायन सादर केला राग ओढव बागेश्री बात आधी रचिली पंढरी,अवघे गर्जे पंढरपूर,अबीर गुलाल अभंगरचना गाऊन वातावरण भक्तिमय केले,त्यांना अप्रतिम साथसंगत तबला अविनाश पाटील हार्मोनियम अभिषेक शिनकर यांनी करत या महोत्सवाची सांगता तबल्यातील चमत्कार यशवंत वैष्णव यांचे दमदार तबलावादनाने झाली, जबरदस्त तयारी, बोलांची स्पष्टता,कायदे,रेले, दुर्मिळ उस्ताद अमीर खा,पं.योगेश समसी यांच्या रचना लीलया सादर करत पंढरपूकर कला रसिकश्रोत्यांना तृप्त करत तबलावादनाने भुरळ पाडली, तितकीच अप्रतिम लहरासाथ अभिषेक सिनकर यांनी केली,या कार्यक्रमाला आरती साउंड सिस्टीम धनंजय मनमाडकर यांनी सुंदर संभाळली.
या महोत्सवाला पंढरपूर व पंढरपूर पंचक्रोशीतील कलारसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.भविष्यकाळातही पंढरपूर नगरीत होणाऱ्या सर्व संगीत मैफिलीला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ज्ञानेश्वर दुधाणे यांच्या वतीने करण्यात येत आहे .
हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी धनंजय मनमाडकर, ज्ञानेश्वर खरात,वैभव केंगार, रामचंद्र अनवते, प्रसाद कुलकर्णी,संगीत भिशी मंडळाच्या शुभांगीताई मनमाडकर, माधूरीताई जोशी, गौरी अंमळनेरकर,अपर्णा बनवसकर,उमा कुलकर्णी,पारुल पारमार, आदींनी अधिक परिश्रम घेत संगीत महोत्सव यशस्वी केला