भाळवणी प्रतिनिधी
जि. प.प्राथ. शाळा पिराची कुरोली ता . पंढरपूर येथे 1 मे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. तसेच सन 2023-24 शाळा पूर्व तयारी मेळावा-1 घेण्यात आला.
यावेळी नवीन दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे शेल्फी पॉंइंट मध्ये फोटो काढणे , मनोरंजक खेळातून शिक्षण पूर्व तयारी घेणे, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणे, पाहिले पाऊल पुस्तके वाटप करून मार्गदर्शन करणे, माता पालक मार्गदर्शन व खाऊ वाटप इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले.
यावेळी विद्यार्थी पालक शिक्षक शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य ,ग्रामस्थ उपस्थित होते.