दसुर प्रतिनिधी
मौजे दसुर तालुका माळशिरस येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही सद्गुरू श्रीगोपीनाथ महाराज, सद्गुरू श्री विठोबादादा महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व परमपूज्य गुरुवर्य श्रीज्ञानेश्वर माऊली महाराज चातुर्मास्ये यांच्या स्नेहमय मार्गदर्शनाखाली वैशाख शु.२ दिनांक २२ एप्रिल ते वैशाख शु.८ २८ एप्रिल २०२३ या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह व किर्तन महोत्सव संपन्न झाला.
गुरुमहिमा, गुरुपरंपरा आणि नामसंकीर्तन असा तिहेरी सुवर्णासंगम या सप्ताहाचे वैशिष्ट राहिले आहे. सद्गुरु श्री चातुर्मास्ये महाराज परंपरेतील असंख्य गुरुभक्त या सप्ताहात सहभाग होतात.
या सप्ताहात सद्गुरु श्रीविठोबादादा महाराज चरित्र कथा ह.भ.प.श्री कैवल्य महाराज चातुर्मास्ये यांच्या अमृत वाणीतून संपन्न झाले असून ह.भ.प.पराग महाराज चातुर्मास्ये , ह.भ. प.विष्णू महाराज गोंडे बीड, ह.भ. प.दत्तात्रय महाराज हूके परंडा , ह.भ.प.संभाजी महाराज मुक्ताईनगर, ह.भ. प.कैवल्य महाराज चातुर्मास्ये आदी कीर्तनकारांची कीर्तन सेवा संपन्न झाल्या.
दि.२८ एप्रिल २३ रोजी प.पू.सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज चातुर्मास्ये यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली, सप्ताहात मोठ्या प्रमाणात अन्नदान झाले. परमार्थबरोबर सामाजिक बांधिलकी जपत अध्यात्मिक प्रगती साधता आली पाहिजे असा गुरूपदेश परमपूज्य गुरुवर्य माऊली महाराज यांनी यावेळी दिला. या सप्ताहास उत्फुर्तपणे सहकार्य केलेल्या सर्व स्वजनांचे आभार संस्थानचे पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया प्रमुख गुरुभक्त स्वागत खपाले यांनी आभार व्यक्त केले.