जोगेश्वरी प्रतिनिधी उदय वाघवणकर
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भाजपा उत्तर पश्चिम जिल्ह्याचे सचिव सिताराम वाडेकर यांच्या पुढाकाराने कै.काशिनाथ गावकर स्मृती ध्वजस्तंभ समर्थ नगर मजासवाडी प्रभाग क्र. ७३ येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.वरिष्ठ पत्रकार, विशेषमालावार्ताचे संपादक, आंबेडकरी विचारांचे पुरस्कर्ते शरदराव बनसोडे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पमाला अर्पण करण्यात आली.
यावेळी डॉ.बाबासाहेबांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले.याप्रसंगी डॉक्टर राहुल वाघमारे, भाजपा जोगेश्वरी विधानसभा महामंत्री पंढरीनाथ केवढे बाळकृष्ण लाड, महिला मोर्चा जिल्हा सचिव स्नेहाली वाडेकर, सांस्कृतिक सेल संयोजक महेश साळवी, झोपडपट्टी जिल्हा उपाध्यक्ष अरुण नाचरे, प्रभाग क्र. ७३ महामंत्री अजित गुळेकर तसेच अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शरद बनसोडे यांनी डॉ. बाबासाहेबांच्या विषयी गौरवोदगार काढून त्यांचे विचार त्यांचे कार्य आणि त्यांचे देशासाठी असलेले योगदान याविषयी मार्गदर्शन केले.