पंढरपूर येथील शिवतिर्थावर मान्यवरांनी केला सन्मान
पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर येथील विश्वभूषण डॉ .बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्यावतीने दिला जाणारा डॉ .बाबासाहेब आंबेडकर जेष्ठ पत्रकार पुरस्कार पत्रकार दादासाहेब कदम यांना डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये येथील शिवतिर्थ, छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी प्रदान करण्यात आला.
यावेळी या कार्यक्रमासाठी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहीनीनाथ महाराज औसेकर, चेअरमन अभिजीत ढोबळे चेअरमन अभिजीत पाटील, डॉ .बी.पी.रोंगे, जनहीत शेतकरी संघटनेचे प्रभाकर भैय्या देशमुख, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डी.राज सर्वगोड, समिती अध्यक्ष नितीन काळे यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
पत्रकार कदम यांनी आपल्या लेखणीतून जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली असून विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करण्यार्या व्यक्तींचा शब्दगौरव केला आहे. समाजातील घटकांना समाज कार्यासाठी प्रवृत्त करून त्यांच्या समाज कार्याला विशेष बळकटी देणारा पत्रकारीतेचा एक नवीन प्रघात त्यांनी समोर आणला आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेवून विश्वभूषण डॉ .बाबासाहेब आंबेडकर प्रितष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डी.राज सर्वगोड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानच्यावतीने कदम यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे यावेळी विविध क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या इतर मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला.
पत्रकार दादासाहेब कदम यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
पुरस्कारामुळे कर्तव्याची जबाबदारी वाढली ......
पत्रकारीतेमधील कार्याची दखल घेवून विश्वभूषण डॉ .बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून मिळालेल्या या राज्यस्तरीय पत्रकारीता पुरस्कारामुळे प्रेरणा तर मिळणारच आहे. परंतु कर्तव्याची जबाबदारीही वाढणार आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे ती जबाबदारी सार्थपणे पार पाडण्याचा प्रयत्न निश्चीतपणे यशस्वी करू. आपण दिलेल्या शुभेच्छा कार्य तत्परतेसाठी सदैव पाठबळ देतील. यात शंकाच नाही.
दादासाहेब कदम,पत्रकार, पंढरपूर