चालु वर्षात २८ वाहनचो-या उघड
पुणे प्रतिनिधी
मा. पोलीस आयुक्त सो पुणे शहर यांनी आठवडा मिटींग (WRM) मध्ये पुणे शहरात वाहन चोरीचे गुन्ह्याचे प्रमाण वाढत असल्याने, त्याबाबत कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या. तसेच मा. विक्रांत देशमुख सो, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांनी देखील हडपसर पोलीस ठाणे येथे अधिकारी यांची बैठक घेवून वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या. बरोष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे अरविंद गोकुळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, यांनी तपास पथक अधिकारी / अंमलदार यांची मिटींग घेवून वाहनचोरीचे गुन्हे उघड करण्यासाठी आराखडा तयार केला. त्याप्रमाणे दिनांक ०६/०४/२०२३ रोजी १४ वाहनचोरीचे गुन्हे हडपसर पोलीसांनी उघड केले होते.
तयार केलेल्या आराखडयानुसार तपास पथक अधिकारी विजयकुमार शिंदे, सपोनि अबिनाश शिंदे, पोउपनिरी पोलीस अमलदार सुशील लोणकर, अजित मदने, कुंडलीक केसकर, चंद्रकांत रेजीतवाड, असे पोलीस ठाणे हद्दीत वाहनचोरी प्रतिबंधक पेट्रोलींग करीत असताना, दोन इसम संशयीत रित्या दुचाको सह मिळून आले. नमुद इसमाकडे गाडीचे कागदपत्राबाबत विचारणा करता त्यांनी असमाधानकारक उत्तरे दिल्याने त्यांना पोलीस ठाणेस घेवून येवून त्याचेकडे तपास करता, आरोपी नामे १) दत्ता शिवाजी दहिफळे वय १८ वर्ष राहणार सध्या भेकराईशाळेच्या बाजूला, माळवाडी, भाऊसाहेब माळ यांचकडे भाड्याने, भेकराईनगर, हडपसर पुणेमुळे राहणार- मु.पो. मारुतीची पांगरी ता. पाटोदा, जि. बीड व २) बाबुराव धर्मराज तोंडे वच १८ वर्ष, राहणार- मु.पो. वेगाव, ता. किल्ले धारूर, जि. बीड असे याने पुणे शहर, बिड या भागातून वेळोवेळी दुचाकी चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.आरोपी नामे १) दत्ता शिवाजी दहिफळे वय १८ वर्षे राहणार सध्या भेकराई शाळेच्या बाजूला, ढमाळवाडी, भाऊसाहेब माळ यांचेकडे भाड्याने, भेकराईनगर, हडपसर पुणे मुळ राहणार- मु.पो. भारतीची पांगरी, ता. पाटोदा, जि. बीड व २) बाबूराव धर्मराज तांडे १८ वर्ष राहणार मु.पो. आंबेगाव, ता. किल्ले धारूर, जि. बीड असे याने पुणे शहर बिड यांना हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं ५६९ / २०२३ भा.दं.वि. कलम ३७६.३४ या गुन्यात अटक करून एकूण १० वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार समीर पांडूळे हे करीत आहेत. आरोपीकडून आज रोजी पर्यंत एकुण ०८ गुन्हे उघडकीस झाले असून किं.रू ७,३०,०००/- चा माल जप्त केला आहे. त्यामध्ये २ बुलेट, ०२ टिव्हीएस बाइक ०२ सीडी डिलक्स ०१ स्पलेन्डर, ०१ बजाज डिसकव्हर, ०१ बजाज टि-२० आणी ०१ यामाहा अशा १० दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
उघडकीस आलेले गुन्हे आणि पो.स्टे पुढीलप्रमाणे हडपसर पो.स्टे ०५ बिड जिल्ह्यातील ०३ गुन्हे असे एकूण ०८ गुन्हे उघडकीस आलेले आहेत. उर्वरित दोन गाडी मालकांचा शोध सुरू आहे. हडपसर पोलीसांनी जानेवारी २०२३ पासून केलेल्या कारवाईमध्ये २७ दुचाकी व १ चारचाकी चोरीचे गुन्हे उघड करून कि. २३,५०,०००/- चा माल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी ही श्री रितेश कुमार मा. पोलीस आयुक्त सो पुणे शहर श्री. संदिप कर्णिक, मा. सह पोलीस आयुक्त सो पुणे शहर श्री. रंजनकुमार शर्मा सो, अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग व मा. विक्रांत देशमुख सो, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली मा. श्री. बजरंग देसाई सो, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्री. अरविंद गोकुळे सो वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. दिगंबर शिंदे सो पोनि (गुन्हे) श्री. विश्वास डगळे सो पानि (गुन्हे) यांचे सूचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक, विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिवे, पोलीस अमलदार, सुशील लोणकर, संदीप राठौड़, समोर पांडुळे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, अतुल पारकर, भगवान हबर्डे, अनिरूध्द सोनवणे, अजित मदने, रशिद शेख, मनोज सुरवसे, अमोल दणके, कुंडलीक केसकर, चंद्रकांत रंजीतवाड याचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.अशी माहिती अरविंद गोकुळे यांनी दिली.