पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर न.पा. प्राथमिक शिक्षण मंडळ अंतर्गत न.पा. प्राथमिक शाळा क्र. ८ व महाराष्ट्र न.पा. प्राथमिक शाळा क्र. १५ येथील इ. १ ली ते ४ थी मधील २६ विद्यार्थी राज्यस्तरीय अभिनय प्रज्ञा शोध परीक्षेस बसले होते. शाळेचे १०० टक्के विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
इ. २ रीतील स्वरांजली आनंद कावरे १०० पैकी १०० गुण मिळवून जिल्हास्तर व राज्य स्तरावर पहिल्या रॅकमध्ये उत्तीर्ण झाली आहे. तसेच क्षीरसागर स्वरा हिस ९८ टक्के व नेहतराव ज्ञानेश्वरी हिस ९८ टक्के गुण मिळाले आहेत. २ मुले व ४ मुली राज्यस्तरीय रँकमध्ये पहिल्या दहामध्ये स्थान मिळविण्यास यशस्वी झाले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक नरळे, सोनवले यांच्याकडून प्रेरणा मिळाली. विद्यार्थ्यांना टेळे, देशमुख, गंगनमले, धावणे व देशमुख यांनी मार्गदर्शन केले.