मायणी प्रतिनिधी
माजी प्राचार्य दिलीप पुस्तके यांना बृहन महाराष्ट्र ज्योतिष मंडळ संचलित वराहमिहीर मुक्त विद्यापीठातर्फे ज्योर्तिविद्या वाचस्पती पीएचडी पदवी कुलपती नंदकिशोर जकातदार यांच्या हस्ते व कुलगुरू आनंदकुमार कुलकर्णी कुलसचिव एडवोकेट मालती शर्मा मनसे सरचिटणीस पुणे एडवोकेट किशोर शिंदे यांच्या उपस्थितीत पुणे येथील कार्यक्रमात देण्यात आला.
प्राध्यापक दिलीप पुस्तके हे 2015 मध्ये जयराम स्वामी विद्यामंदिर व जुनिअर कॉलेज वडगाव येथून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी 2020 मध्ये बॅचलर ऑफ जर्नालिझम तर 2021 मध्ये मास्टर ऑफ जर्नालिझम ही पदवी ए प्लस मध्ये मिळवली आहे त्यांचा विवाह विलंब शास्त्र हा संशोधनाचा विषय होता. विवाह विलंबनास सामाजिक आर्थिक कारणाबरोबर ज्योतिष कारणाचा आहे त्यांनी आपल्या संशोधनात विषय मांडला आहे विवाह या गंभीर समस्येवर त्यांनी प्रकाश टाकला आहे अनेक वृत्तपत्रातून मासिकातून त्यांचे लेख प्रसिद्ध होतात.
त्यांच्या यशाचे माजी आमदार प्रभाकर घार्गे माजी आमदार दिलीपराव येळगावकर मानसिंगराव माळवे सभापती समाज कल्याण अमोल माळवे श्रीमंत पाटील रणजीत सिंह देशमुख राजाराम कचरे आनंदा शेवाळे सुशांत देशमुख तसेच तसेच अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले