वेळापूर प्रतिनिधी जयराम घाडगे
वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी निलेश बागाव यांनी वेळापूर पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी जे पोलीस महिनाभरात त्यांच्याकडे असणाऱ्या कर्तव्यातून त्यांच्याकडे असणाऱ्या केसचा कागदपत्रांची जुळवाजुळी करून वेळेत केस दाखल करणे, प्रत्येका कडे असणाऱ्या बीटमध्ये कशाप्रकारे कामकाज केले, शांतता व्यवस्था कायद्याच्या चौकटीत राहून विविध कार्यक्रम सादर करणे याबाबत केलेले मार्गदर्शन, गावा गावात होणारी भांडणे तंटामुक्त समिती च्या सदस्यांना बरोबर घेऊन त्याचा निपटारा करणे, एक्सीडेंट झालेल्या ठिकाणी वेळेत जाऊन जखमींना तातडीने दवाखान्यात हलवून त्यांचे प्राण वाचवणे यासाठी मदत करणे व रोडवरील वाहने वेळेत बाजूला करणे ,कर्तव्यावर असताना अत्यंत जबाबदारीने काम करणे यास अनेक गोष्टींचा समावेश करून वेळापुर पोलीस स्टेशनच्या वतीने चांगले काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी निलेश बागाव यांनी बेस्ट पोलीस ऑफ मंथ ही नवीन प्रमाणपत्र देऊन गौरव केला जाणार असून याची नुकतीच घोषणा करण्यात आली असून या महिन्याचे दोन पोलिस कर्मचारी वेळापूर पोलीस स्टेशनचे उप पोलीस निरीक्षक संजय राऊत व महिला पोलिस प्रिया सूर्यवंशी यांची नावे जाहीर करून त्यांचा वेळापूर पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व पोलीस कर्मचारी यांच्या साक्षीने निलेश बागाव यांनी सन्मान केला.
यावेळी बोलताना निलेश बागाव म्हणाले की पोलीस कर्मचारी आपापल्या बीटमध्ये २४ तास चांगले काम करतात अनेकांचे प्राण वाचवतात अपघातग्रस्तांना वेळेत दवाखान्यात पोचवतात अशा सर्वच पोलीस कर्मचाऱ्यांचा गौरव करणे गरजेचे असून जे पोलीस कर्मचारी चांगले काम करतील अशा सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचा प्रत्येक महिन्याला सन्मान केला जाईल असे यावेळी निलेश बागाव यांनी सांगितले. यावेळी उपनिरीक्षक अल्ताफ काझी, संजय रेगुडे, तानाजी लिंगडे यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते.