केसकरवाडी प्रतिनिधी बिरूदेव केंगार
पंढरपूर तालुक्यातील केसकरवाडी येथील पंचशील दूध संस्थेचे चेअरमन संजय रखमाजी मासाळ यांच्या वाढदिवसानिमित्त तेज न्यूज परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संपादक प्रशांत माळवदे यांच्या हस्ते शाल, पुष्पहार, श्रीफळ देऊन संजय मासाळ यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संजय मासाळ म्हणाले माझ्या सामाजिक राजकीय कार्याची नेहमीच आपल्या तेज न्युज परिवाराकडून दखल घेतली जाते आणि त्यामुळे सामाजिक आणि राजकीय कार्य करताना, कामे करताना उत्साह वाढतो. आपण करीत असलेली सामाजिक,राजकीय कामे कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता करीत असल्यामुळे सर्वसामान्यांच्या जनतेस मदतीस धावून जाणे हेच मी माझे कर्तव्य समजतो असेही मासाळ म्हणाले.यावेळी दत्ता मासाळ यांनी आभार मानले.