पंढरपूर प्रतिनिधी
श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विवेकवर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथीलअनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये चमकले आहेत. त्यापैकी सर्जेराव पडवळकर या विद्यार्थ्याची नुकतीच विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई येथे अव्वर सचिव पदी नियुक्ती झाली आहे.त्याबद्दल त्यांचा सत्कार प्रशालेच्या व संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
त्यावेळी बोलताना पडवळकर म्हणाले की,आजच्या विद्यार्थ्यांनी एमपीएससी, यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षेची तयारी आत्मविश्वासाने करावी तरीसुद्धा व्यवसाय शिक्षणही घेणे गरजेचे आहे कारण स्पर्धा परीक्षेत यश नाही मिळाले तरी आपणास व्यवसायामध्ये यश मिळू शकेल.ग्रामीण भागातील मुले देखील अशा उच्च पदावर विराजमान होऊ शकतात असे त्यांनी सांगितले ते विवेकवर्धिनी विद्यालयाचे व वसतीगृहाचे माजी विद्यार्थी आहेत.
यावेळी त्यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्राचार्य राजेंद्र पाराध्ये यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्युनिअर विभाग प्रमुख उत्तरेश्वर मुंढे यांनी केले .यावेळी किमान कौशल विभाग प्रमुख संजय पवार, ॲड राम शिंदे, प्रा.तुकाराम मस्के व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.