सोलापूर प्रतिनिधी
भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई यांचे कडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार सोलापूर जिल्ह्यामध्ये दिनांक ०४ एप्रिल २०२३ ते ०८ एप्रिल २०२३ दरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहील. दिनांक ०४ एप्रिल व ०५ एप्रिल २०२३ रोजी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. दिनांक ०६ एप्रिल २०२३ रोजी तुरळक ठिकाणी तर दिनांक ०७ आणि ०८ एप्रिल २०२३ रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस ते ३९ अंश सेल्सिअस पर्यंत तर किमान तापमान १८ ते २२ अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आद्रता ७४ ते ८६ % तर दुपारची सापेक्ष आद्रता ३५ ते ४९ % दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वार्या चा वेग ताशी १४.१ किमी ते २१.९ किमी पर्यन्त राहण्याची शक्यता आहे.
*ईशारा* : भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या अंदाजानुसार सोलापूर जिल्ह्यात दिनांक ०७ एप्रिल आणि ०८ एप्रिल २०२३ रोजी तुरळक ठिकाणी वादळी वारा (३० ते ४० कि.मी./तास), मेघगर्जना, विजांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे .
अशी माहिती जिल्हा कृषि हवामान केंद्र, कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ, सोलापूर यांनी सांगितली आहे.