पंढरपूर प्रतिनिधी
मौजे अनवली (ता.पंढरपूर) हद्दीतील घोडकेवस्ती भाटघर कॅनॉलच्या पाण्यात दि. 26 मार्च 2023 रोजी बेवारस पुरुष जातीचा इसम मयत अवस्थेत मिळून आला असल्याची माहिती पंढरपूर तालुका पोलीस ठाणे यांनी पत्रकान्वये कळवली आहे.
या अनोळखी मयत व्यक्तीचे वय अंदाजे 30 ते 35 वर्षे, उंची 5 फुट 6 इंच, रंगाने सावळा, चेहरा गोल, हातात लाल रंगाचा दोरा, अंगावर कपडे नसलेला स्थितीत आढळून आला असून, याबाबत संबधितांनी तसेच ओळखीच्या व्यक्तीने पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे, आवाहन करण्यात आले आहे.