सोलापूर प्रतिनिधी
परसबाग सोलापूरची आणि अडेनियम क्लब,सोलापूर च्यावतीनें डेझर्ट रोझ अर्थात अडेनियम रिपाॅटिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असुन नाव नोंदणी सुरु करण्यात आली असुन ती दि.१२ एप्रिलपर्यंत सुरु राहणार आहे.
साधारणपणे एप्रिलच्या शेवटच्या सप्ताहात होणारी ही कार्यशाळा सर्वांसाठी विनामुल्य आहे. सहभागीर्थींना रिपाॅटिंगसाठी लागणारे पाॅट मिक्स नाममात्र मुल्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
अडेनियम हा वाळवंटातील गुलाब अथवा Desert Rose या नांवानें ओळखला जातो.त्याला अत्यंत नाममात्र पाणी,खतं लागतात.कोणतेही लाड न करताही अत्यंत उष्ण तापमानातही अडेनियम छान बहरतो. त्यासाठी सोलापूरातील वातावरण त्याला पोषक आहे.त्याची रंगीबेरंगी फुलं आणि विविधांगी आकार आपलं लक्ष वेधुन घेतात.बागेची आणि घराचीसुध्दा शोभा वाढवतात.
Adenium Club हा परसबाग सोलापूरची या मातृसंस्थेचा एक नव्याने कार्यान्वित होणारा उपक्रम आहे.
सोलापूर आणि परिसरात बाग तिथे अडेनियम ही संकल्पना घेऊन Adenium Club चा प्रारंभ करण्यात येत आहे.अडेनियमच्या जातकुळीतील
Cactus आणि Succulent Repoting साठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणारी आहे.
नाव नोंदणी आणि माहितीसाठी आपलं
★संपूर्ण नाव
★संपूर्ण पत्ता
★अडेनियमचे वय
या माहितीसह ९१४५७९०९३८ या WhatsApp वर मेसेज करावा.फोन करु नये असे आवाहन संयोजकांनी केले आहे.