केसकरवाडी प्रतिनिधी बी.ए. केंगार
पंढरपूर तालुक्यातील केसकरवाडी येथील स्वस्त धान्य दुकानांमध्ये पात्र असणाऱ्या कार्ड धारकांना रेग्युलर आणि आनंदाचा शिधाचे वाटप आजपासून सुरु करण्यात आले.
शिंदे सरकारने घोषणा केल्याप्रमाणे,14 एप्रिल या दिवशी म्हणजेच घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच औचित्य साधून गरीब, दुर्बल घटकांना हा आनंदाचा शिधा प्रत्येक लाभार्थ्यांना मिळावा अशी तरतूद केली व तो शिधा केसकरवाडी स्वस्त धान्य दुकानांमध्ये व्यवस्थितरित्या दिनांक 12/4/2023 पासून सुरु राहणार आहे.
यावेळी पात्र लाभार्थ्यांनी रेगुलर माल व आनंदाचा शिधा घेऊन जावे असे आव्हान स्वस्त धान्य दुकानदार लहू रामचंद्र केसकर यांनी केले आहे.
यावेळी सरपंच रूपाली केसकर, ज्ञानेश्वर दादा केसकर मा. तंटामुक्ती अध्यक्ष, अब्बास मुजावर मा. सरपंच, मधुकर मासाळ मा.ग्रा सदस्य, हणमंत मासाळ, हणमंत केसकर मा. जि. प. प्रा. शाळा अध्यक्ष, शिव प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण सुरवसे, काका मासाळ, केराप्पा केसकर मा. तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष केसकर सोसायटी चेअरमन व लाभार्थी उपस्थित होते.