पंढरपूर प्रतिनिधी संपत लवटे
श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित,इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर अँड मॅनेजमेंट स्टडीज कासेगाव पंढरपूर या महाविद्यालयांमध्ये जागतिक आरोग्य दिन संपन्न झाला.
आज महाविद्यालयामध्ये जागतिक आरोग्य दिनानिमित्त डॉ.स्नेहा रोंगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,आरोग्य कसे सुधारते, आरोग्याविषयी महत्त्वाच्या टिप्स,व आरोग्याविषयी काळजी कशी घ्यावी, आहार व व्यायाम यामुळे शरीर कसे तंदुरुस्त राहते.तसेच त्यांनी आहार कोणत्या पद्धतीचा आवश्यक आहे, व कोणत्या वेळेमध्ये घेतला पाहिजे आणि किती घेतला पाहिजे, कॉलेजच्या विद्यार्थिनींनी स्वतःच्या शरीरातील हार्मोन्स बॅलन्स कशाप्रकारे व्यवस्थित ठेवता येईल. यावर सुद्धा मार्गदर्शन केले. "दिनचर्या असावी व्यायामयुक्त, निरोगीच जीवन त्यांचे चिंतामुक्त नित्य प्राणायाम आणि करता योग जीवनाचा खरा घेता येईल उपभोग." असा आरोग्य विषयी कानमंत्र देखील डॉ.स्नेहा रोंगे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.
या कार्यक्रमानिमित्त कॉलेजच्या कॅम्पस प्रमुख डॉ.जयश्री भोसले,विभाग प्रमुख,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, उपस्थित होते डॉ.स्नेहा रोंगे यांचा सत्कार डॉ.जयश्री भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव.डॉ.बी.पी.रोंगे अध्यक्ष एच.एम.बागल,उपाध्यक्ष बी.डी.रोंगे,खजिनदार दादासाहेब रोंगे यांनी अभिनंदन केले.