पंढरपूर प्रतिनिधी
श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन संचलित, इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर अँड मॅनेजमेंट स्टडीज, कासेगाव पंढरपूर या महाविद्यालयामध्ये महात्मा जोतिराव फुले यांची १९६ वी जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाच्या कॅम्पसप्रमुख डॉ.जयश्री भोसले यांच्या हस्ते करण्यात आले व त्यानंतर त्या म्हणाल्या की,शिक्षणाचे जनक असलेल्या फुले दांपत्यामुळेच आज शैक्षणिक क्षेत्रात ऐतिहासिक बदल दिसून येत आहेत. महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या महान कार्यामुळेच आज महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्य करत आहेत. त्याचे संपूर्ण श्रेय महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना जाते. महात्मा फुले यांचे सामाजिक कार्य खूप महान आहे आणि ते कधीच विसरता येणार नाही. आज समाजात कोठेही भाषण असो अथवा शैक्षणिक सभा असो, महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव हमखास निघते. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेने महात्मा जोतिबा फुले यांनी समाज सुधारण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यामुळे त्यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य अविस्मरणीय असे आहे.’
महात्मा जोतिराव फुले यांच्या योगदानामुळे आज समाजात स्त्री व पुरुष खांद्याला खांदा लावून कार्य करत आहेत असा विचार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.एस.भोईटे यांनी मांडला. महात्मा जोतिराव फुले यांची १९६ वी जयंती साजरी करण्यासाठी महाविद्यालयाचे विभागप्रमुख प्रा.मुकुंद चौगुले, अॕकॅडमीक इन्चार्ज, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सदर जयंती अगदी मोठ्या उत्साहात साजरी केल्याबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे, अध्यक्ष एच.एम.बागल, उपाध्यक्ष बी.ङी.रोंगे व संस्थेचे खजिनदार व विश्वस्त दादासाहेब रोंगे यांनी अभिनंदन केले आहे.