पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
पंढरपूर शहराच्या गजबजलेल्या समजणाऱ्या स्टेशन रोडवरील एका दुकानांमध्ये सार्वजनिक कार्यक्रमाच्या वर्गणीवरून मोठा वाद होऊन दुकानांमध्ये राडा झाला. यामध्ये दुकानदाराच्या डोक्यात बॅटने मारून व दुकानातील वस्तूची नासधूस करून नुकसान केल्यामुळे या परिसरात रविवारी रात्री नऊ ते दहा च्या सुमारास वातावरण तंग झाल्याने या परिसरातील व्यापाऱ्याने आपापली दुकाने पटापट बंद केली.
सध्या सर्वत्र जत्रा उत्सव सुरू आहे एप्रिल महिन्याची सुरुवात आणि मराठी नववर्षाची पाडव्याला होणारे सुरुवात यानंतर सर्वत्र धार्मिक सामाजिक सार्वजनिक उत्सवाची लगभग चालू असते त्याला पंढरी अपवाद नाही वर्गणीच्या कारणावरून पंढरपूर मध्ये फार मोठा राडा झाला असून पोलिसांनी वेळीच बंदोबस्त केल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी पंढरीची वाटचाल आता मिनी बिहार कडे तर चालू आहे का ? अशी शंका नागरिकांना येऊ लागली आहे.
दोनच दिवसांपूर्वी किरकोळ विक्रीचा हातगाडा लावण्यावरून नामदेव मंदिर परिसरात सत्तुर वसईने एकाला मारहाण केल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अलीकडे पंढरीत कायदा व सुव्यवस्था मोकळ्या असून पंढरपुरात रोज कोठे ना कोठे किरकोळ तक्रारी चालूच असून पंढरपूरकरांना प्रश्न पडला आहे की पंढरी नगरीत पोलीस प्रशासन आहे की नाही ? एवढी पंढरपूर शहर पोलिसांची निष्क्रियता वाढली आहे.
गेले तीन दिवस सलग सुट्टी आल्याने पंढरीत सुमारे एक ते दीड लाख भाविकांची वर्दळ होती अशातच रविवारी रात्री वर्गणी मागण्याच्या कारणावरून व ती न दिल्याच्या रागापोटी मारहाण करण्यात आल्याने स्टेशन रोडवर एकच गोंधळ उडाला अशातच मोठी गर्दी झाल्याने आलेल्या भाविकांचे तारांबळ उडाली तेथे उपस्थित असलेल्या काहींनी व या परिसरात चर्चे तून असे समजते की गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्यपण एचडी मार करावा लागला.
पंढरपूर शहरात सध्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने वातावरण भारावून गेले असल्याने अशातच रविवारी हा राडा झाल्यामुळे शहरांमध्ये शांततामय भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पंढरपुरात व येणाऱ्या भाविकांना पोलीस प्रशासन पंढरीत आहे का नाही असाच प्रश्न पडला आहे एवढी पंढरपूर शहर पोलीस स्टेशनची निष्क्रियता सर्वांना जाणवत आहे.
जर वेळीच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने तसेच जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक शिरीषजी सरदेशपांडे यांनी जातीने लक्ष घालून पंढरपूर सारख्या संवेदनशील तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी चांगल्या पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक असणे गरजेचे आहे असे पंढरपूरकरांना वाटत आहे वेळीच जर यामध्ये वरिष्ठ आणि लक्ष घातले नाही तर पंढरीत मोठा अनर्थ घडल्याशिवाय राहणार नाही असेच रविवारच्या परिस्थितीवरून पंढरपूरकरांना जाणवत आहे.