सोलापूर प्रतिनिधी
गुरूविद्या प्रतिष्ठान वतीने महात्मा बसवेश्वर जयंती निमित्ताने जुळे सोलापूर येथे डॉ श्रेयस वळसंगकर यांच्या श्रेयस क्लिनिक येथे सर्व रोग निदान शिबिर शनिवार दिनांक १५/४/२३ सकाळी ठीक ११/३० वाजता संप्पन्न झाला.
यावेळी व्यासपिठावर संस्थापक सोमशेखर भोगडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सातलिंग शटगार, बसवेश्वर उत्सव समिती अध्यक्षा नमिता थिटे, उपाध्यक्ष राजश्री तडकासे, सचिवा श्रीदेवी यळमेली सल्लागार मोहन भूमकर, श्री विजयकुमार (अप्पा) भोगडे, दत्तात्रय जामदार,डॉ. श्रेयस वळसंगकर यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ संस्कृती वळसंगकर वैद्यकीय अधिकारी सोलापूर महानगरपालिका सोरेगाव यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रथम जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर प्रतिमेचे पूजन करुन दिपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी कुंभार सर बसव वचन गीत सादर केले. श्रेयस क्लिनिक जुळे सोलापूर येथे मोफत सर्व रोग तपासणी शिबिरात 245 जणांनी लाभ घेतला.
यावेळी श्रीकांत कुलकर्णी,उदय कुलकर्णी,हुलसुरे, वसंत वळसंगकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नंदकुमार थिटे, शिवलिला भोगडे, क्लिनिक स्टाॅप यांनी परीश्रम घेतले. सुत्रसंचलन श्रीदेवी यळमेली तर आभार प्रदर्शन नमिता थिटे यांनी केले.