नारायणगाव प्रतिनिधी
सामाजिक क्रांतिकारक,स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते महात्मा ज्योतिबा फुले यांची 196 वी जयंती तसेच भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंतीचे औचित्य साधून लोकनाट्य तमाशा कलावंतांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. सुजन फौंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदरणीय याकूभाई इनामदार अध्यक्ष दत्त ज्येष्ठ नागरिक संघ महाळुंगे पडवळ होते. प्रमुख उपस्थिती दत्तात्रय माळी सांगली अध्यक्ष लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी समिती, श्री संपतराव जाधव अध्यक्ष भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव समिती महाराष्ट्र , कैलास जेजुरकर अध्यक्ष संजीवनी लोकसेवा संस्था महाराष्ट्र , सागर जगताप अध्यक्ष समाज समता संघ पुणे जिल्हा यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचा शुभारंभ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजित जाधव अध्यक्ष सुजन फौंडेशन आदर्की बुद्रुक फलटण यांनी केले.भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सवी वर्ष व राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष निमित्ताने महाराष्ट्राची लोककला लावणी संस्कृती जोपासण्याचे काम आणि करमणूक , व मनोरंजनाच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करण्याचे काम तमाशा मंडळे करत आहेत.लोकनाट्य तमाशा कलावंतांनी स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्या उत्तर काळामध्ये सामाजिक प्रबोधन कार्यामध्ये बहुमोल योगदान दिले आहे. कलावंतांच्या कार्याच्या प्रती कृतज्ञता व आदर व्यक्त करण्याच्या उद्देशाने सुजन फौंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने कलावंतांना मानचिन्ह, महावस्त्र ,गौरव चिन्ह गुलाब पुष्प व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा देऊन यांचा सन्मान करण्यात आला.
सन्मानाचे मानकरी मालती इनामदार तमाशा मंडळ , तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर तमाशा मंडळ , विलास कुमार देवठाणकर सह शेषकन्या पुणेकर तमाशा मंडळ, वामन पाटोळे मेंढापुरकर तमाशा मंडळ, सर्जेराव जाधव निमगावकर तावडी तमाशा मंडळ, बाळा अल्हाट नेतवडकर तमाशा मंडळ, दत्तोबा तांबे शिरोलीकर तमाशा मंडळ, छाया खिलारे बारामतीकर तमाशा मंडळ, चंद्रकांत ढवळपुरीकर यांचे चिरंजीव किरण कुमार ढवळपुरीकर तमाशा मंडळ, अंजली राजे नाशिककर लोकनाट्य तमाशा मंडळ, राष्ट्रपती सुवर्णपदक प्राप्त विठाबाई नारायणगावकर तमाशा मंडळ, रेखा सविता नगरकर तमाशा मंडळ ,सविताराणी पुणेकर तमाशा मंडळ , संध्या माने सोलापूरकर तमाशा मंडळ, हरिभाऊ बडे शिवकन्या बडे नगरकर तमाशा मंडळ , दत्ता महाडिक पुणेकर तमाशा मंडळ , नंदाराणी भोगटे तमाशा मंडळ, आम्रपाली पुणेकर तमाशा मंडळ, आनंद लोकनाट्य मंडळ जळगाव , कांतीलाल पाटील राशीकर तमाशा मंडळ, गणेश राजे सांगवीकर लोकनाट्य तमाशा मंडळ या मंडळांच्या मुसा इनामदार, अशोक साठे, गायकवाड मॅनेजर , अरुण वायाळ , बाळासो पाटोळे, मॅनेजर दत्ता विधाते , रंगनाथ गुळवे , वैजनाथ क्षीरसागर, सचिन ढवळपुरीकर , शांताराम वाणी, मोहित नारायणगावकर, शरद दानवे ,श्री सादिक मणियार, रामभाऊ बिरमल, श्री एल जी शेख, काशिनाथ फुलसुंदर , सुभाष श्री सोनवणे मॅनेजर, राजू बागुल रवी महाजन, अरुण वाव्हळ, शेख अख्तर या प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपतराव जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एकनाथ आंबटकर , सुदाम पडवळ, सुनील वाळुंज , काशिनाथ शिंदे , दत्तात्रय जेजुरकर,राष्ट्रपती सुवर्णपदक मानकरी विठाबाई नारायणगावकर यांचे नातू मोहित नारायणगावकर यांचे बहुमोल सहकार्य लाभले . मोहित नारायणगावकर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.