भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील वार्ड क्रमांक 3 मधील बंदिस्त गटाराच्या बांधकामाचे उद्घाटन सरपंच राजकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी इस्माईल मुलाणी, भगवानराव चौगुले, हरिभाऊ शिंदे तानाजी वाघमोडे , उपसरपंच सविता लोखंडे,अविंदा गायकवाड, शंकर गायकवाड, ग्रामविकास अधिकारी डी एस वाघमारे,राजू बाबर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अविंदा गायकवाड म्हणाल्या की, आमदार शहाजी बापू पाटील यांच्या सहकर्यातून दलित वस्ती सुधारणा निधीतून या गटारांचे बांधकाम करण्यात येणार आहे. यापुढील काळात अजून आमदार फंडातून विविध विकास कामांचे नियोजन करण्यात आले आहे. लवकरच निधी उपलब्ध करून विकास कामे केली जाणार आहेत. या भागातील विविध विकास कामे करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. हा निधी उपलब्ध करण्यासाठी आम्ही पाठपुरावा केला आहे.असे ही गायकवाड यांनी सांगितले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गजेंद्र माने, रावसाहेब कांबळे, सोमनाथ गायकवाड, शिवाजी लोखंडे, वैभव माने प्रकाश वाघमारे, उषा कांबळे, इंदिराबाई मागाडे,ताई गायकवाड जनाबाई गायकवाड, वंदना लोंढे, विद्या भोसले, वैशाली मोरे यांनी परिश्रम घेतले.