पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार दादासाहेब कदम तसेच पत्रकार नवनाथ खिल्लारे यांना पत्र महर्षी मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल सहकार शिरोमणीचे माजी संचालक व संपादक तानाजी जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक पत्रकार विनोद पोतदार यांच्या वाढदिवसानिमित्त अतुल फराटे,प्रशांत माळवदे यांच्या हस्ते शाल पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी दादा कदम म्हणाले असा सत्कार होईल अशी अपेक्षा नव्हती.पण सर्व सहकाऱ्यांनी माझा सत्कार केला मी आभारी आहे.
यावेळी नवनाथ खिल्लारे म्हणाले की आज अपेक्षित नसलेला सत्कार झाला आहे.सर्वांचे आभार आहे.
यावेळी विनोद पोतदार म्हणाले की पत्रकार प्रशांत माळवदे यांचा आणि माझा फार जुना रूणानुबंध आज माझा वाढदिवस साजरा केला.त्यांनी फार तळमळीने केला मी वाढदिवस साजरा करण्याच्या मनस्थितीत नव्हतो.तरी देखील हा माणूस माझा मनःपूर्वक सत्कार करुन मला भरभरुन शुभेच्छा दिल्या याबद्दल मी त्यांचा व सर्वांचा आभारी आहे.