उदय वाघवणकर जोगेश्वरी प्रतिनिधी
कुमारी वैष्णवी अनिल म्हसकर हिने राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय अंधेरी पश्चिम येथे मेकॕनिकल इंजिनियरची पदवी चांगल्या पाॕंईटरमध्ये मिळविली.
सोमवार दि.१७ एप्रिल २०२३ रोजी झालेल्या दिक्षांत समारंभात ही पदवी वैष्णवीला ही पदवी सन्मानपुर्वक प्रदान करण्यात आली.
वैष्णवी हीचे वडिल अनिल म्हसकर हे सामाजिक व राजकीय क्षेत्रात खुप चांगले काम करत असून मुलीने मिळवलेले यश पाहता आजवर केलेल्या कष्टाचे चीज झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.वैष्णवीच्या या नेत्रदीपक कामगिरीमुळे समाजातील सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.