सोलापूर प्रतिनिधी
गुरूविद्या प्रतिष्ठानच्या विविध बसव मानद पुरस्कार कार्यक्रमात सूरूवातीस जगद्ज्योती महात्मा बसवेश्वरावराचे प्रतिमेचे पूजन आणि दिप प्रज्वलीत कार्यक्रमाची सुरुवात झाली. गुरूविद्या प्रतिष्ठाने नेहमी समाजात प्रेरणा देण्याचे विधायक कार्य करण्याचे काम केले त्या माध्यमातून संस्कृती व संस्कार जपण्याचे कार्य केले असे मत माजी सरकारी वकील असे पुरस्कार वितरण कार्यक्रमात संतोष न्हावकर बोलत होते
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षण संचालक दिलीप सहस्त्रबुद्धे याची उपस्थिती होती. गुरूविद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष सातलिंग शटगार, उपाध्यक्षा राजश्री तडकासे, बसव उत्सव समिती अध्यक्षा नमिता थिटे, संस्थापक सोमशेखर भोगडे, सल्लागार मोहन भूमकर, जेष्ठ सदस्य विजयकुमार (अप्पा) भोगडे, यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप सहस्त्रबुद्धे सर्व मानद बसव पुरस्कार व्यक्तींचे कौतुक करून आताची शिक्षण पध्दती काळानुसार बदलत आहे असे मत व्यक्त केले. जगद्ज्योती महात्मा बसवेश्वराचे वचन आणि बसवगीत सादर कुंभार यांनी केले. या वेळचे बसव मानद पुरस्काराचे पुरुषोत्तम दुर्गाप्रसाद बलदवा.गुरूविद्या बसव रत्न पुरस्कार,श्रीमती मंगलाताई विश्वनाथ कुनाळे.गुरुविद्या बसव माता पुरस्कार. चंद्रशेखर चनबसप्पा भोगडे.( लातूर ).गुरूविद्या बसव भुषण पुरस्कार. लक्ष्मण नामदेवबापू नागणे, सुवर्णा लक्ष्मण नागणे.गुरुविद्या बसव शरण दांपत्य पुरस्कार, गुरुपादप्पा रामचंद्र तुप्पद. जयश्री गुरुपादप्पा तुप्पद.गुरुविद्या बसव शरण दापंत्य पुरस्कार. वैशाली वसंत वळसंगकर.गुरुविद्या बसव भक्त पुरस्कार. अरुणा मल्लिनाथ वारद.गुरुविद्या बसव शरणी पुरस्कार, विजयकुमार विरभद्र स्वामी.गुरुविद्या बसव श्री पुरस्कार. पुरस्काराने सन्मान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह,प्रमाणपत्र,शाल,हार बुके,असे होते.
प्रास्ताविक राजश्री तडकासे यांनी केले. तसेच प्रमुख पाहुणे माजी शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य दिलीप सहस्त्रबुद्धे यांनी आपल्या भाषणात जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या कार्याचा आढावा घेऊन पुरस्कार प्राप्त व्यक्तीना शुभेच्छा दिल्या.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरकारी वकील संतोष न्हावकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांनी बाराव्या शतकात बाल विवाहास विरोध केला होता. ते आताच्या काळात सूध्दा आचरणात आणले जात आहे.
बसवेश्वर वचन आणि कार्याचा आढावा घेऊन पुरस्कार प्राप्त व्यक्तीना आणि गुरूविद्या प्रतिष्ठानला शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन सचिवा श्रीदेवी यळमेली, यांनी केले. आभार प्रदर्शन मोहन भुमकर यांनी मानले.
कार्यक्रमास बसव भक्तांची बहुसंख्येने उपस्थित होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहसचिवा रेणूका हब्बु, सदस्य दत्तात्रय जामदार , आनंद लिगाडे शिवलीला भोगडे, मंजुर शेख , प्रतिक्षा खंडाळकर, .नेहा भोगडे, नितीन भोगडे, नर्मदा मिठ्ठा, दिपाली लिगाडे यांनी परिश्रम घेतले.