मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे
समता ट्रस्ट आणि वीन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गुरू नानक खालसा काॕलेज, माटुंगा (पूर्व) येथे महाबोधी मिशन चे संस्थापक मा. श्री .भन्ते बौध्द धम्म गुरू यांच्या शुभहस्ते सामाजिक क्षेत्रातील महामानव विश्वरत्न डाॕ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान पुरस्कार देऊन समाजसेविका सुरक्षा शशांक घोसाळकर यांना विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले.
त्याप्रसंगी गजलनवाज भीमराव पांचाळे, डाॕ. बागेश्री पांचाळे, सुप्रसिद्ध गायक,निवेदक श्री . त्यागराज खाडिलकर, दैनिक प्रहार चे संपादक श्री . सुकृत खांडेकर, सिनेगायिका शकुंतला जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कीर्तनकार वीणा खाडिलकर यांनी केले.