अकलूज प्रतिनिधी
२२ व २३ एप्रिल रोजी अकलूज मध्ये विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलात आमदार रणजित सिंह मोहिते पाटील व बीसीसीआयच्या वतीने टाटा आयपीएल फॅन पार्क उभारण्यात येणार आहे. क्रिकेट चाहत्यांना मोठ्या स्क्रीनवर थेट सामना बघण्याची संधी मिळते. सामने सुरू असलेल्या क्रिकेट मैदानावर जसे वातावरण असते अगदी त्याच धर्तीवर हे फॅन पार्क तयार करण्यात येते.
यावेळी आ. रणजितसिंह मोहिते पाटील म्हणाले की आपल्या अकलूज मध्ये सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिशनचा अध्यक्ष म्हणून मला हा उपक्रम क्रिकेट प्रेमींसाठी घेता आला याचे समाधान वाटते. क्रिकेट चाहत्यांना विनामूल्य हा सामना मोठ्या स्क्रीनवर आपल्या संकुलात बघता येणार आहे.
यावेळी २२ एप्रिल रोजी गुजरात टायटन विरुद्ध लखनऊ जायंट व मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब इलेव्हन, २३ एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर तर चेन्नई सुपरकिंग विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या आयपीएल क्रिकेट सामन्यांचा थरार अनुभवायला मिळणार आहे. तसेच यावेळी विविध करमणुकीचे कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहे.