पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक 2023 पांडुरंग परिवार प्रणित कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक शेतकरी विकास आघाडीचा प्रचाराचा शुभारंभ चळे ता. पंढरपूर येथे पांडुरंगचे चेअरमन प्रशांत परिचारक व पांडुरंग परिवारातील जेष्ठ मंडळीच्या उपस्थितीत झाला...!
यावेळी परिचारक म्हणाले,की बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देत असतांना सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक व क्रीडा क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती शेतीमालाची आदर्श बाजारपेठ या नावलौकिकात आणखी भर टाकून शेतकऱ्यांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे...!
बाजार समितीचे भविष्यातील हित लक्षात घेऊन पांडुरंग परिवार प्रणित कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक शेतकरी विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी मतदारांनी खंबीरपणे उभे राहून कपबशी या चिन्हवरती शिक्का मारून भरघोस मतांनी आपल्या आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणावे असे आव्हान केले....!
बाजार समितीचे काम अधिक प्रभावी आणि तत्पर व्हावे म्हणून तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर होईल याकडे आमच्या पॅनलचे पूर्ण लक्ष असेल अशी खात्री परिचारक यांनी यावेळी व्यक्त केली...!
यावेळी सहकारी संस्था मतदार संघातील मतदार, ग्रामपंचायत मतदार संघातील मतदार ,पांडुरंग परिवार प्रणित कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक शेतकरी विकास आघाडीचे सर्व उमेदवार तसेच परिवारातील ज्येष्ठ सहकारी, तरुण सहकारी आदी उपस्थित होते...!