पंढरपूर प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील येथील एस.के.एन.सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग व इलेक्ट्रिकल इंजीनिअरिंग स्टुडंट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने "माय पॉवर सॉफ्टवेअर याविषयावर म वर्कशॉप आयोजित करण्यात आले होते. हे वर्कशॉप मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी "माय पॉवर सॉफ्टवेअर" याविषयावर ऑनलाइन वर्कशॉप आयोजित करण्यात आले होते . महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे व उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
वर्कशॉप च्या सुरुवातीस विभाग प्रमुख डॉ. बी.बी गोडबोले यांनी सत्र तज्ञ श्रीमती आर एस विना यांचे आभार मानले. डॉ. आर. एम. पाटील यांनी तज्ञ बद्दल माहिती दिली.
वर्कशॉप वेळी बोलताना एस. आर विना म्हणाल्या, विद्यार्थ्यांना माय पॉवर सॉफ्टवेअर बद्दल सखोल माहिती असणे आवश्यक आहे. या सॉफ्टवेअरचा आपल्या प्रोजेक्टमध्ये कसा वापर करायचा याबद्दल प्रॅक्टिकल डेमोस्ट्रेशन या पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व या सॉफ्टवेअर मधील प्रोग्रामिंग पार्ट व प्रत्येक टूल बद्दल प्रात्यक्षिक द्वारे माहिती विद्यार्थ्यांना दिली व वर्कशॉपला ला इलेक्ट्रिकल डिपारमेंट चे तृतीय आणि चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थी उपस्थित होत
हे व्याख्यान यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील विभाग प्रमुख डॉ. बी बी गोडबोले व डॉ. आर एम पाटील, प्रा. प्रदीप व्यवहारे, प्रा . किशोर जाधव आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. आर एम पाटील यांनी केले तर सत्र तज्ञ यांची माहिती प्रा. प्रदीप व्यवहारे यांनी दिली.