जोगेश्वरी प्रतिनिधी उदय वाघवणकर
आमदार व माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या हस्ते रविवार दिनांक - १९ मार्च रोजी जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील ज्या सोसायट्यांनी कचऱ्याचे डबे आणि ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंच मागितले होते. त्याप्रमाणे आमदार वायकर यांनी ज्येष्ठ नागरिकांना बेच देऊन मोठे सहकार्य केले आहे. बँचमुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची सोय होणार आहे. त्याबद्दल ज्येष्ठ नागरिकांनी आमदार वायकर यांचे आभार मानले आहे.
त्या संस्थांना कचऱ्याचे डबे आणि बेंच वाटप करण्यात आले.यावेळी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.