पंढरपूर प्रतिनिधी
१२ सायन्स उत्तीर्ण झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरींग चे शिक्षण घ्यायचे आहे अशा विद्यार्थ्यांना "एमएचटी-सीईटी २०२३" ची परीक्षा देणे आवश्यक आहे.
"एमएचटी-सीईटी २०२३ या परीक्षेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याच्या तारखा जाहिर झाल्या असुन ८ मार्च २०२३ ते ७ एप्रिल २०२३ या कालावधीत इंजिनिअरींगच्या प्रवेशाकरीता अत्यंत महत्वपूर्ण समजली जाणारी ‘एमएचटी-सीईटी २०२३’ ही परीक्षा देणे आवश्यक आहे. बारावी सायन्स उत्तीर्ण झाल्यानंतर इंजिनिअरींगसाठी प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ‘एमएचटी-सीईटी २०२३’ चे रजिस्ट्रेशन करणे अत्यंत गरजेचे आहे.
ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थी व पालकांच्या सोयीसाठी मोफत रजिस्ट्रेशन करण्याची सोय कोर्टी (ता. पंढरपूर) एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये केली आहे. सदर अर्ज भरण्यासाठी येताना विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवर्गाशी संबंधित कागदपत्रे, आधार कार्ड, फोटो आणि अर्जाचे शुल्क ऑनलाईन भरण्यासाठी एटीएम अथवा फोन पे/गुगल पे सुविधा असणारा मोबाईल सोबत आणणे आवश्यक आहे. अर्ज भरताना होणाऱ्या चुका लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी खात्रीशीर अर्ज नोंदणी करावी व या प्रक्रियेत चुका होणार नाहीत याची काळजी घ्यावी.
या ‘एमएचटी-सीईटी २०२३’ च्या ऑनलाईन नोदणीसंबंधी अधिक माहितीसाठी प्रा. उमेश घोलप ८०५५१०३७१५, प्रा. विनोद मोरे ९९७५४६३७४६, डॉ. शिरिष कुलकर्णी ९८५०८८८२२३, प्रा. शाम भिमदे ९२०९२३४०१७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज चे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी केले आहे.