सोलापूर प्रतिनिधी
महिला दिनाचे औचित्य साधून केगाव येथील एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात 'माझी आई माझ्या महाविद्यालयात' हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांच्या माता पालकांना आमंत्रित केले होते.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून चार्टर्ड अकाउंटंट श्रीमती स्वाती जोशी या उपस्थित होत्या.सिंहगड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शंकर नवले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
या कार्यक्रमाची सुरवात सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलनाने झाली.याप्रसंगी सिंहगड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शंकर नवले,चार्टर्ड अकाउंटंट श्रीमती स्वाती जोशी,उपप्राचार्य डॉ. रवींद्र व्यवहारे, डॉ. सुवर्णा क्षीरसागर,प्रा. सुनीता सगट,माजी विद्यार्थिनी कु. अंकिता रोटे,सिंहगड हिरकणी फोरमचे सदस्य, जनरल सेक्रेटरी चिन्मय झोड,विद्यार्थिनी प्रतिनिधी ऋतुजा राऊत इ. उपस्थित होते.
या कार्यक्रमाची प्रस्तावना सिंहगड हिरकणी फोरमच्या अध्यक्षा डॉ. सुवर्णा क्षीरसागर यांनी केली व महाविद्यालयातील विविध उपक्रमाची माहिती प्राचार्य डॉ.शंकर नवले यांनी दिली.यादरम्यान प्रमुख पाहुण्या श्रीमती स्वाती जोशी यांची ओळख प्रा. सुनीता सगट यांनी करून दिली व यावेळी प्रमुख पाहुण्या स्वाती जोशी यांनी अतिशय साध्या व सुलभ भाषेमध्ये 'आर्थिक साक्षरता ' या विषयावर विविध टिप्स व उदाहरणे सांगत मार्गदर्शन केले.दररोज थोडीशी बचत करून तुम्हाला भविष्यात मोठी रक्कम कशी मिळवता येते, याचे महत्व उदाहरणासहित दिले व सर्वांसाठी ही माहिती अतिशय असल्याची भावना सर्व उपस्थितीना दिली.
यादरम्यान माजी विद्यार्थिनी कु. अंकिता रोटे हिने तिच्या फायनल एअर मध्ये बनवलेला प्रोजेक्ट ' महिलांसाठी सुरक्षित जॅकेट 'याबद्दल माहिती दिली.तसेच कॉलेजमधील प्राध्यापकांनी केलेले मार्गदर्शन तसेच लायब्ररी व लॅबच्या सुविधा याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.प्रथम वर्षाची विद्यार्थिनी कु. गौरी जिंदे हिने 'स्त्री भ्रूण हत्या ' या विषयावर एकपात्री नाट्य अतिशय उत्कृष्ट रित्या सादर करून उपस्थितानच्या डोळ्यात पाणी आणले व या विषयाची जागृती केली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री तळेकर हिने केले व प्रा. मनीषा माळी यांनी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी "सिंहगड हिरकणी फोरमचे" सर्व सदस्य, जनरल सेक्रेटरी चिन्मय झोड,नोमन शेख विद्यार्थीनी प्रतिनिधी निकिता कोळेकर,ऋतुजा राऊत तसेच स्टुडन्ट कौन्सिलचे सर्व सदस्य यांनी मदत केली.या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी मार्गदर्शन व प्रोत्साहन सिंहगड संस्थेचे सहसचिव व सिंहगड सोलापूरचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले व प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी केले.