सोलापूर प्रतिनिधी
लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी च्या वतीने व लायन्स क्लबच्या माजी आंतरराष्ट्रीय संचालिका लायन डॉ. अरुणाजी ओसवाल यांचा वाढदिवस व हिंदू नववर्ष गुढीपाडवा या दोन्ही दिवसाच्या औचित्य साधून आदिवासी पारधी समाज संस्कार संजीवनी अनाथ आश्रम मुळेगाव रोड सोलापूर येथे तेथील 50 ते 60 विद्यार्थ्यांना स्वादिष्ट श्रीखंड व पुरी चे जेवण देऊन हा आनंदाचा सण व दिवस साजरा करण्यात आला.
आपल्या अध्यक्ष मनोगता मध्ये बोलताना अध्यक्ष अभियंता सागर पुकाळे यांनी म्हणाले की समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या वृत्तीने लायन अरुणाची ओसवाल यांचा वाढदिवसाच्या औचित्य साधून आम्ही ह्या अनाथ मुलांना नववर्षा निमित्त गोड गोड खायला मिळावे. त्यांचेही वर्ष सुखा समृद्धीत जावे म्हणून लायन्स क्लब ट्विन सिटीच्या माध्यमातून हा उपक्रम घेतल्याचे म्हणाले यावेळी सचिव रविकिरण वायचळ खजिनदार राजेश परस्पर तसेच या अनाथ आश्रम च्या संचालक श्री व सौ परमेश्वर काळे यांच्यासह तेथील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.