भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कारखाना कार्यस्थळावर सभासदांना बिल न मिळाल्यामुळे सभासदांनी चंद्रभागाचे माजी संचालक दिपक पवार यांच्या नेतृत्वाखाली कल्याणराव काळे व त्यांच्या संचालक मंडळाचा जाहीर निषेध केला.
यावेळी दिलीप काळे, मधुकर गिडे, किसन कौलगे, दिलीप साळुंखे, शशिकांत विभुते, जयराम शिंदे, गणेश देशमुख, विलास गोफने, दत्तात्रय बागल, धोंडीराम घोलप, धोंडीराम शेळके, अरुण पांढरे, सिद्धेश्वर शेंडगे आदी उपस्थित होते.
यावेळी दिपक पवार म्हणाले आज गुढीपाडव्याच्या सण असून सभासदांना उसाचे बिल अजून मिळालेले नाही सभासदांनी गुढीपाडवा कसा सण साजरी करावा? हा मोठा प्रश्न पडला आहे गेली पाच सहा वर्ष सभासदांना कोणताही सण आनंदाने साजरा करता येत नाही बिल वेळेवर मिळत नाही आणि साखर मिळत नाही सण साजरा होणार कसा हा मोठा प्रश्न आहे.
आज पर्यंत कारखान्यांनी ऊस बिल, एफ आर पी वरील व्याज काटा पेमेंट, बिल ऊस तोडणी वाहतुकीचे बिल,कामगार पगार, मालकाची देणे अशी सर्व प्रकारची बिले थकवली आहेत. त्यामुळे सभासद शेतकरी कामगार ट्रॅक्टर मालक यांच्यावर अत्यंत वाईट वेळ आलेली आहे. आम्ही या ठिकाणी काळी गुढी उभारून कल्याणराव काळे व त्यांच्या संचालक मंडळाचा जाहीर निषेध करीत आहोत. वसंतदादांचे जे स्वप्न होते त्या स्वप्नांचा चक्काचूर झाला आहे सभासदांना कोणत्याही प्रकारची किंमत दिली जात नाही.
कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार असा प्रचार केला जात आहे हे खरेच आहे. मी सभासदांच्या घरोघरी जाऊन सभासदांचे मत ऐकून घेत आहे त्यावेळी चेअरमन आणि संचालक मंडळ यांच्या विषयी मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे त्यामुळे सभासद निश्चितपणाने यावर्षी बदल घडवणार आहे आणि येणारा पुढील गुढीपाडव्याचा सण सभासद याच कारखाना कार्यस्थळावर मोठ्या प्रमाणात साजरा करताना दिसणार आहे असेही दिपक पवार यांनी सांगितले.
यावेळी शेतकरी, सभासद, वाहन मालक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.