पंढरपूर प्रतिनिधी संपत लवटे
श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित, इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर अँड मॅनेजमेंट स्टडीज, कासेगाव पंढरपूर या महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय वन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर बी.सी.ए व बी.एस्सी (ईसीएस) मधील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची झाडे लावून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. सदर दिवस हा जंगले आणि त्यांचे महत्त्व याबद्दल जागृती निर्माण करणे हे या दिनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.विविध प्रकारच्या जंगलांच्या महत्वा विषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. अशी माहिती महाविद्यालयाच्या कॅम्पसप्रमुख डॉ.जयश्री भोसले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए. एस.भोईटे यांनी दिली.
२०१२ मध्ये यूएन जनरल असेम्ब्लीने २१ मार्च हा आंतरराष्ट्रीय वन दिवस म्हणून घोषित केला. हा दिवस लोकांना जंगलाचे महत्त्व आणि जतन करण्याची तसेच जिवंत प्राण्यांच्या जीवनात जंगलांचे महत्त्व लक्षात आणून देण्यासाठी साजरा केला जातो असा विचार महाविद्यालयाचे विभागप्रमुख प्रा. मुकुंद चौगुले यांनी व्यक्त केला. सदर दिनानिमित्त महाविद्यालयामध्ये वृक्षारोपण करून आंतरराष्ट्रीय वन दिवस मोठ्या उत्साहात साजरा केल्याबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे, अध्यक्ष एच.एम. बागल, उपाध्यक्ष बी.डी.रोंगे, खजिनदार दादासाहेब रोंगे यांनी अभिनंदन केले.